Home > Coronavirus > पुणे : कोरोना निर्बंधांबद्दल गृहमंत्र्यांचे मोठे विधान

पुणे : कोरोना निर्बंधांबद्दल गृहमंत्र्यांचे मोठे विधान

पुणे :  कोरोना निर्बंधांबद्दल गृहमंत्र्यांचे मोठे विधान
X

पुणे, मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी कोरोनाची रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. पुण्यातही रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंध शिथिल करावे, दुकानं संध्याकाळी ४ नंतरही सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी पुणे शहराबाबत कोव्हीड आढावा बैठक घेतली.

या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. पण अजित पवार यांना मात्र काही कारणास्तव बैठक सोडून निघावे लागले. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पुण्यातील कोरोना निर्बंध तूर्तास शिथिल होणार नाहीत. पुण्यामधील लसीकरण सुरू आहे मात्र लसीकरण पूर्ण व्हावे यावर आमचा भर आहे. पुणे झोन तीनमध्ये आहे त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करता येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत एक ते दोन दिवसात चर्चा करुन निर्णय होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याचे आदेश देण्याबाबत सकारात्मकता असेल, असेही सांगत त्यांनी निर्बंध शिथिल होऊ शकतात असे संकेत दिले आहे.

Updated : 30 July 2021 7:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top