Home > Coronavirus > राज्यात JN 1 चे नऊ नवे रुग्ण ; सर्वाधिक रुग्ण ठाण्यात, मुंबईत नोंद नाही

राज्यात JN 1 चे नऊ नवे रुग्ण ; सर्वाधिक रुग्ण ठाण्यात, मुंबईत नोंद नाही

राज्यात JN 1 चे नऊ नवे रुग्ण ; सर्वाधिक रुग्ण ठाण्यात, मुंबईत नोंद नाही
X

देशासह राज्यात नवा कोरोना व्हेरियट ‘जेएन.१’ हा कोरोना झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत ‘जेएन.१’ची नऊ रुग्णांना लागण झाली असल्याची रविवारी नोंद आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या १० झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे जिल्ह्यात आढळले आहेत, तर पुणे आणि अकोला या ठिकाणी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

महाराष्ट्रात यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळला होता. नऊ रुग्णांपैकी पुण्यातील एका रुग्णाचा समावेश असून तो अमेरिकेतून आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या रुग्णांची लक्षण सौम्य असून ते उपचारातून बरे होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रविवारी ठाणे पालिका क्षेत्रात ५ रुग्ण, तर पुणे पालिका क्षेत्रात २, तर पुणे ग्रामीण क्षेत्रात १ आणि अकोला पालिका क्षेत्रात १ असे नऊ रूग्ण आढळले. यापैकी ८ पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे.

Updated : 25 Dec 2023 3:32 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top