Home > Coronavirus > नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या घटली, 24 तासात 10 हजार 891 रुग्ण

नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या घटली, 24 तासात 10 हजार 891 रुग्ण

नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या घटली, 24 तासात 10 हजार 891 रुग्ण
X


राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासात राज्यात १६,५७७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५५ लाख ८० हजार ९२५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. पण राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३५% एवढे

झाले आहे. गेल्या 4 तासात राज्यात १० हजार ८९१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर २९५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३% एवढा आहे. राज्यात सध्या एकूण १ लाख ६७ हजार ९२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान मुंबईतील नवीन रुग्णसंख्या घटली असून गेल्या 24 तासात शहरात केवळ 682 रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरात 362 रुग्ण आढळले आहेत. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात 141 रुग्ण आढळले असून 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रआत 94 नवीन रुग्ण आढळले आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Updated : 8 Jun 2021 2:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top