Home > Coronavirus > कोरोनाच्या संकटासाठी मुंबई महानगरपालिका सर्तक आहे का?

कोरोनाच्या संकटासाठी मुंबई महानगरपालिका सर्तक आहे का?

कोरोनाच्या संकटासाठी मुंबई महानगरपालिका सर्तक आहे का?
X

चीनमधील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत असताना संपूर्ण जग हायअर्लटवर गेले आहे. अशातच भारतातील नागरिक वैयक्तिक काळजी घेत असताना, मुंबई महानगरपालिका सर्तक आहे का? असा प्रश्न अनेक मुंबईकरांना पडलेला आहे. चीन या देशासारखी कोरोना रुग्णांची भयानक परिस्थिती मुंबईत उद्भवू नये, यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष सतर्कतेची पाऊले उचलेली आहेत. मुंबईत कोरोनाची संख्या वाढली तर सर्वप्रथम मुंबई महानगरपालिकेने अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालय सज्ज ठेवले आहे. अशी माहिती डॉ. महारुद्र कुंभार यांनी दिली.

सध्या १८५० खाटा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध असल्याने, २२८ खाटा आयसीयू, तर ६५० खाटा ऑक्सिजनसाठी उपलब्ध ठेवले आहेत. त्यामुळे सर्वप्रथम सेव्हन हिल्स रुग्णालय सतर्क ठेवले आहे. मागील कोरोनाच्या काळात रुग्णांच्या अनुभवावर २४ हजार लीटर ऑक्सिजनची क्षमता सर्वाधित साठवून ठेवली आहे. मागील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांची संख्या कमी केली होती. परंतू शासनाच्या आदेशानंतर आम्ही पुन्हा स्टाफची संख्या वाढवू. आता सध्या रुग्णालयात ८३ डॉक्टर, आणि १६० नर्स उपलब्ध आहेत. अशी प्रथमदर्शी माहिती सेव्हन हिल्स रुग्णालयाचे वरिष्ठ डॉ. महारुद्र कुंभार यांनी दिली.

Updated : 24 Dec 2022 1:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top