Home > Top News > मुंबईत कोविड इमर्जन्सी: पालिकेची युद्धपातळीवर तयारी

मुंबईत कोविड इमर्जन्सी: पालिकेची युद्धपातळीवर तयारी

राज्यभरात एका दिवसातील कोरोना संख्येनं पन्नास हजार ही संख्या गाठत मुंबईत दररोजची रुग्णसंख्या थेट नऊ हजारांवर गेल्याने मुंबई महानगर पालिकेने युद्धपातळीवर कोरोना उपचारांसाठी तयारी सुरू केली आहे.

मुंबईत कोविड इमर्जन्सी: पालिकेची युद्धपातळीवर तयारी
X

मुंबई महानगर पालिकेने वेगाने बेड वाढवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी 69 नर्सिंग होमही ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तीन हजार बेड वाढणार असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ हजारांवर येत आहे. यामध्ये सुमारे 80 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसली तरी तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयांत दाखल करावे लागत आहे.

होम क्वारंटाइनसाठी घरी स्वतंत्र टॉयलेट आणि व्यवस्था नसणाऱयांनाही पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे लागत आहे.त्यामुळे पालिकेला दररोज शेकडो बेडची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे याआधी खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड आणि 100 टक्के आयसीयू पालिकेने ताब्यात घेतले आहेत. आता 69 नर्सिंग होमही ताब्यात घेण्यात येत आहेत.


जानेवारीपर्यंत मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे या नर्सिंग होममध्ये 'नॉन कोविड' रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी पुन्हा आवश्यकतेनुसार बेड वाढवण्यात येणार आहेत.मुंबईतील 30 ते 35 बडय़ा खासगी रुग्णालयांमध्येही कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ठिकाणी शासनाच्या दरपत्रकानुसार शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर नजर ठेवण्यासाठी पालिका अधिकाऱयांही नेमणूकही करण्यात आली आहे.मुंबईत बेडची कमतरता पडू नये यासाठी पालिकेने फिल्ड हॉस्पिटल संकल्पनेखाली 'जम्बो कोविड सेंटर' सुरू केली आहेत. जानेवारीत रुग्णसंख्या कमी झाल्याने काही बेड कमी करण्यात आले होते, मात्र आता रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सर्व बेड सुरू करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.यामध्ये दहिसर, गोरेगाव नेस्को, बीकेसी वांद्रे, मुलुंड, रिचर्डसन क्रुडास भायखळा आणि एनएससीआय डोम वरळी या ठिकाणी ही जम्बो कोविड सेंटर सुरू आहेत. एकंदरीतच महानगर पालिका प्रशासन कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहे.

Updated : 4 April 2021 7:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top