Home > Coronavirus > शाब्बास! महाराष्ट्र, एकाच दिवसात 5.5 लाख लोकांचं लसीकरण

शाब्बास! महाराष्ट्र, एकाच दिवसात 5.5 लाख लोकांचं लसीकरण

महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक

शाब्बास! महाराष्ट्र, एकाच दिवसात 5.5 लाख लोकांचं लसीकरण
X

राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे.

महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात अग्रेसर असून हे सातत्य टिकवत आतापर्यंत सुमारे २ कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. आज दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचे लसीकरण झाले.

रात्री ८ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. यापूर्वी दि. २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.

Updated : 23 Jun 2021 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top