Home > Coronavirus > देशात 24 तासातील कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक

देशात 24 तासातील कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक

देशात 24 तासातील कोरोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक
X

देशात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचा नवा उच्चांक गेल्या चोवीस तासात गाठला गेला आहे. 24 तासात तब्बल 2 लाख 61 हजार 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 1 लाख 77 हजार 150 एवढी झाली आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 47 लाख 88 हजार 109 एवढी झाली आहे. तर एक्टिव्ह रुग्णांची संख्या 18 लाख 1 हजार 316 एवढी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 1 लाख 38 हजार 423 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान देशभरात आतापर्यंत 12 कोटी 26 लाख 22 हजार 950 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. सध्या देशात तीन लस देण्यात येत आहेत. यामध्ये कोव्हॅक्सिन, कोविशिल्ड आणि रशियाची स्पुटनिक- V. रशियाची लस भारतात देण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. देशात सध्या 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

Updated : 18 April 2021 5:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top