Home > Coronavirus > सोलापुरात दहा दिवसांत 613 बालकांना कोरोनाची लागण ; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

सोलापुरात दहा दिवसांत 613 बालकांना कोरोनाची लागण ; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 613 बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बाधित मुलांच्या या संख्येने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

सोलापुरात दहा दिवसांत 613 बालकांना कोरोनाची लागण ; पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
X

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत 613 बालकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित मुलांच्या या संख्येने जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासूनच मुलांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळाले होते. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 18 वर्षांखालील तब्बल 12 हजार बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे.अलिकडच्या काही दिवसांत बालकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतांना दिसत आहे. यात अगदी गेल्या दहा दिवसांत तब्बल 613 बालके कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेषत: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बाधितांचे प्रमाण मोठे आहे. या वयोगटात लसीकरण झालेले नसल्यामुळे बाधितांचे प्रमाण वाढत असल्याचे बोलले जातं आहे. मात्र, लहान मुलांमध्ये फारशी लक्षणे दिसत नसून त्यांच्यात जास्त धोका नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे.

शहर व जिल्ह्यात आतापर्यंत गेल्या सव्वा वर्षांत आढळून आलेल्या बाधित मुलांमध्ये सर्वाधिक 11 हजार 886 मुले जिल्हा ग्रामीणमधील आहेत. यात 6773 मुले तर 5113 मुलींचा समावेश आहे. या दहा दिवसांत बाधित मुलांच्या संख्येत मोठी वाढ झाली असली तरीही परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक असण्याची भीती सुरुवातीपासून व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्य़ातील वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

दहा लाख मुलांची तपासणी: जिल्हा आरोग्य विभागाने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर 18 वर्षांखालील सुमारे 10 लाख मुलामुलींची आरोग्य तपासणी केली. 60 पेक्षा अधिक मुले कोरोनाबाधित दिसून आली होती. याशिवाय सुमारे पाचशे मुलांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळून आली.

Updated : 5 Aug 2021 6:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top