Home > Coronavirus > राज्यभरात कोरोनाची आज सर्वोच्च वाढ:५९,९०६ रुग्णांची नोंद;तर ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

राज्यभरात कोरोनाची आज सर्वोच्च वाढ:५९,९०६ रुग्णांची नोंद;तर ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

एकीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये लसीकरणावरून राजकीय वादाचे तुंबळ युद्ध सुरू झालेला असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असताना राज्यभरात कोरोनाची आज सर्वोच्च कोरोना रुग्ण वाढ होऊन ५९,९०६ झाली तर ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यभरात कोरोनाची आज सर्वोच्च वाढ:५९,९०६ रुग्णांची नोंद;तर ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू
X

बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ३२२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा एकुण आकडा ५६ हजार ६५२ वर गेला आहे.त्यासोबतच वाढते करोनाबाधित ही देखील आरोग्य व्यवस्थेसाठी चिंताजनक गोष्ट ठरली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५९ हजार ९०७ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. या सर्व परिस्थितीमध्ये राज्यात आज ३० हजार २९६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही त्यात दिलासादायक बाब ठरली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत राज्यात ३१ लाख ७३ हजार २६१ करोना बाधित सापडले आहेत. त्यापैकी सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख १ हजार ५५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी, २१ हजार २१२ व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्याचा मृत्यू दर १.७९ टक्के इतका असल्याची नोंद झाली आहे.

मुंबईत १० हजार ४२८ नवे रुग्ण

मुंबईत आज दिवसभरात १० हजार ४२८ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यासोबतच ६ हजार ७ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी देखील परतले आहेत. दिवसभरात मुंबईत २३ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या एकूण मृतांचा आकडा ११ हजार ८५१ इतका झाला आहे. तर एकूण करोनाबाधितांची संख्या ४ लाख ८२ हजार ७६० इतकी झाली आहे.

पुण्यात दिवसभरात ४१ मृत्यू

पुणे शहरात दिवसभरात ५ हजार ६५१ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर करोनाबाधितांची ३ लाख ५ हजार ५७२ इतकी संख्या झाली आहे. याच दरम्यान पुण्यात ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ५ हजार ५६७ झाली आहे. त्याच दरम्यान ४ हजार ३६१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ५३ हजार ७३४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्य सरकारने आज केंद्रावर आरोप करत लसींचा जाणीवपूर्वक कमी पुरवठा केल्याचं म्हटलं आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी पलटवार करत राज्य सरकार कोरोना नियंत्रणात सपशेल अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. एकंदरीत राज्य आणि केंद्र सरकारच्या संघर्षात राज्यातील कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.

Updated : 7 April 2021 6:05 PM GMT
Next Story
Share it
Top