Home > Coronavirus > #CovidVaccine : देशात कोरोनावरील पहिल्या सिंगल डोस लसीला मान्यता

#CovidVaccine : देशात कोरोनावरील पहिल्या सिंगल डोस लसीला मान्यता

#CovidVaccine : देशात कोरोनावरील पहिल्या सिंगल डोस लसीला मान्यता
X

देशात कोरोनाच्या लसीकरणाचा गोंधळ सुरू असताना आता केंद्र सरकारने आणखी एका लसीला मान्यता दिली आहे. Johnson and Johnson सिंगल डोस लसीला केंद्र सरकारने आपत्कालीन वापराची परवानगी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे. यामुळे आता देशात कोरोनाच्या एकूण लसींच्या संख्या ५ झाली आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक, मॉडर्ना या लसींना आधीच मान्यता मिळाली असून सध्या देशभरात या लसी दिल्या जात आहेत. भारत सरकारकडे Johnson and Johnson च्या सिंगल डोस लसीला मान्यता देण्यासाठी विनंती करण्यात आली होती, अशी माहिती Johnson and Johnson कंपनीतर्फे शुक्रवारी देण्यात आली होती.

Johnson and Johnson ची सिंगल डोस लस भारतात मान्यता मिळालेली पहिली लस ठरली आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे की, लसीच्या तीन टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अत्यंत चांगले आहेत. ही लस ८५ टक्के प्रभावी असून ती घेतल्यानंतर कोरोनामुळेगंभीर आजार होत नाहीत, तसेच रुग्णाला एडमिट करण्याची गरज पडत नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

भारतात कोरोनो लसीकरणाने पार केला ५० कोटींचा टप्पा

एकीकडे आणखी एक लस भारतात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशात कोरोनावरील लस घेतलेल्या रुग्णांची संख्या ५० कोटींच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४९ लाख ५५ हजार १३८ नागरिकांचे लसीकरण कऱण्यात आले आहे.

Updated : 7 Aug 2021 11:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top