Home > Coronavirus > देशातील पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना, एक वर्तुळ पूर्ण

देशातील पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना, एक वर्तुळ पूर्ण

देशातील पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना, एक वर्तुळ पूर्ण
X

देशात गेल्यावर्षी सुरू झालेले कोरोनाचे थैमान अजूनही कायम आहे. आता कोरोनाच्या(COVID-19) संकटाला दीड वर्ष उलटून गेले आहे. मात्र आता या कोरोनाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. देशात कोरोनाची पहिली रुग्ण (FIRST PATINET ) ठरलेल्या मेडिकलच्या विद्यार्थिनीला आता पुन्हा कोरोना झाला आहे. ही महिला केरळमध्ये (KERALA )असून मेडिकलची विद्यार्थिनी आहे. ही विद्यार्थिनी चीनमधील वुहान (WUHAN) विद्यापीठात शिक्षण घेत होती. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये वुहान विद्यापीठामधून परतलेल्या या विद्यार्थिनीला सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता तिला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.

केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या विद्यार्थिनीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, पण तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तिने सध्या घरीत क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे, पण तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. २० वर्षांची ही विद्यार्थिनी केरळमधल्या थ्रीसूरमध्ये राहते. १३ जुलै रोजी म्हणजेच मंगळवारी तिची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. तिने अजून कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही.

एकीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी केरळ आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर तिसरी लाट अटळ आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे. तर केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या रोखण्याचे आव्हान आहे. केरळमध्ये सध्या १ लाखांच्यावर कोरोनाचे एक्टिव्ह रुग्ण आहेत. पण रुग्ण बरे होण्याचा दर ९५. ८९ आहे. तर रुग्णांचा मृत्यू दर ०.४८ आहे.

Updated : 14 July 2021 4:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top