Home > Coronavirus > कोरोनाच्या महासंकटात दिलासा: ५ हजार वैद्यकीय अधिकारी १५ हजार नर्सेस कोविड सेवेसाठी मिळणार

कोरोनाच्या महासंकटात दिलासा: ५ हजार वैद्यकीय अधिकारी १५ हजार नर्सेस कोविड सेवेसाठी मिळणार

दुसऱ्या कोरोना लाटेने महाराष्ट्राला मोठा तडाखा दिला असताना एक दिलासादायक बातमी हाती येत आहे. पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने तिसरी साठी उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

कोरोनाच्या महासंकटात दिलासा: ५ हजार वैद्यकीय अधिकारी १५ हजार नर्सेस कोविड सेवेसाठी मिळणार
X

राज्यात कोविड-19 चा मोठया प्रमाणात झालेला फैलाव लक्षात घेता, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार पाच हजार दोनशे वैद्यकीय अधिकारी आणि पंधरा हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा येत्या 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात हे डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत.राज्यातील विविध नर्सिंग कॉलेजमधील जी.एन.एम आणि ए.एन.एम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या नर्सेसेच्या सेवा त्या – त्या जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतील.राज्यात विविध जिल्ह्यात आणि विशेषत: शहरी भागात कोविड परिस्थितीचा सामना करतांना वैद्यकीय क्षेत्रातील मनुष्यबळाची मोठी कमतरता जाणवत आहे. या निर्णयामुळे डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या सेवा मोठया प्रमाणात उपलब्ध होणार आहेत.

Updated : 5 April 2021 2:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top