Home > Coronavirus > कोरोनाच्या प्रश्नांचे गाठोडे मोठे: सामना

कोरोनाच्या प्रश्नांचे गाठोडे मोठे: सामना

कोरोनाच्या प्रश्नांचे गाठोडे मोठे: सामना
X

courtesy social media

कोरोना महामारी च्या निमित्ताने लागू केलेल्या लॉकडाऊन आणि निर्बंधा विरोधात व्यापारी आणी सर्वसामान्य आक्रमक झाले असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधून कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही असा सल्ला दिला आहे.

कोरोनाचा तिस-या लाटेचा संकट असताना आता लॉकडाऊन विरोधात व्यापारी आणि सर्वसामान्यांचे उद्रेक सुरू झाला आहे. व्यापाऱ्यांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची भाषा देखील केली आहे.

कोरोना पूर्णपणे गेला नाही, पण लोक आता निर्बंध पाळायला तयार नाहीत असे वातावरण सर्वत्र दिसत आहे. हिमाचलमधील सिमला, कुलू मनाली अशा पर्यटनस्थळी गेल्या चार दिवसांपासून प्रचंड गर्दी उसळली आहे. ही गर्दी रोखता येत नसेल तर जम्मू कश्मीरमधील अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच्या उत्सवांवर बंदी टाकून काय मिळवले? कोल्हापूरच्या व्यापारी मंडळानेही निर्बंध न पाळण्याची म्हणजे बंडाची भाषा सुरू केली आहे.

हे लोण फार पसरू नये याबाबत सरकारला विचार करावा लागेल. मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद आहे. सिनेमा, नाटयगृह बंद पडल्याने या झगमगत्या व्यवसायावर जळमटे येऊ लागली; मुंबईचे बॉलीवूड व त्यांचे चमकते सितारे ही महाराष्ट्राची ओळखच नव्हे, तर वैभव मानले जाते, पण आता हा झगमगाट काळोखात गडप झाला आहे. लाखो लोकांचा रोजगार त्यामुळे ठप्प झाला आहे, असे सामनातून सांगण्यात आले आहे.

कोल्हापूरप्रमाणेच मुंबईतील व्यापारी संतप्त झाल्याचे दिसत आहे. सध्या आठवडय़ातले पाच दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. आता मुंबईचे व्यापारी मंडळही बोलू लागले की, दुकानांची वेळ वाढवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू. शाळा, कॉलेज बंदच आहेत तसे हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योगाचीही वाताहत झाली.हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्यागाचीही वाताहत झाली. होटेलचा कर्मचारीवर्ग बेरोजगार झाला आहे त्याचप्रमाणे हॉटेल्सना भाज्या, दूधपुरवठा करणारे, लॉण्ड्रीवाले हे सगळेच धुळीस मिळाले आहेत. कोरोना व त्यामुळे लादलेल्या निर्बंधांमुळे लोकांचे साफ कंबरडे मोडले. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असेल तर निर्बंध हटवावेत, असे सगळय़ांचेच म्हणणे पडत आहे.

एका बाजूला बंधनं आधी करण्याची मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला कोरूना चा संसर्ग मात्र वाढत असल्याचं सामनामधून सांगण्यात आला आहे. राज्यात रविवारी 6,013 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 8,535 कोरोनाबाधितांची नोंद दिवसभरात झाली 156 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के आहे. एका बाजूला कोरोनामुळे कडक निर्बंध तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविल्याचे विदारक चित्र आहे. पाऊस गायब झाल्याने राज्यातील पाच जिल्ह्यांत दुष्काळांची गिधाडे फडफडू लागली आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांत पाऊसच गायब झाला आहे.

कोकणातही पुरेसा पाऊस झाला नसल्याची नोंद आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 लहान-मोठय़ा धरण प्रकल्पांत जेमतेम 25 टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध व दुष्काळ अशा कात्रीत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोक सापडले आहेत. गेल्या चोवीस तासांत देशात कोरोनाचे 41 हजार नवे रुग्ण आढळून आले. सवातीन कोटी लोक दोन दिवसांत बरे झाले आहेत. हे खरे असले तरी आजही लसीकरणाची गती कमी आहे. लसीचा तुटवडा आहे. यावर राहुल गांधींनी मारलेला टोला गमतीशीर आहे. गांधी म्हणतात, "मंत्र्यांची संख्या वाढली, पण लसीची संख्या वाढली नाही." केंद्राने नव्या फेरबदलात आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना बदलले व मनसुख मांडविया यांना आणले. पण लस तुटवडय़ाचा कोरोना पूर्णपणे गेला नाही, पण लोक आता निर्बंध पाळायला तयार नाहीत असे वातावरण सर्वत्र दिसत आहे.

हिमाचलमधील सिमला, कुलू मनाली अशा पर्यटनस्थळी गेल्या चार दिवसांपासून प्रचंड गर्दी उसळली आहे. ही गर्दी रोखता येत नसेल तर जम्मू कश्मीरमधील अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच्या उत्सवांवर बंदी टाकून काय मिळवले? कोल्हापूरच्या व्यापारी मंडळानेही निर्बंध न पाळण्याची म्हणजे बंडाची भाषा सुरू केली आहे. हे लोण फार पसरू नये याबाबत सरकारला विचार करावा लागेल. मुंबईची लोकल ट्रेन सेवा बंद आहे. सिनेमा, नाटयगृह बंद पडल्याने या झगमगत्या व्यवसायावर जळमटे येऊ लागली; मुंबईचे बॉलीवूड व त्यांचे चमकते सितारे ही महाराष्ट्राची ओळखच नव्हे, तर वैभव मानले जाते, पण आता हा झगमगाट काळोखात गडप झाला आहे. लाखो लोकांचा रोजगार त्यामुळे ठप्प झाला आहे.

कोल्हापूरप्रमाणेच मुंबईतील व्यापारी संतप्त झाल्याचे दिसत आहे. सध्या आठवडय़ातले पाच दिवस संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास परवानगी आहे. आता मुंबईचे व्यापारी मंडळही बोलू लागले की, दुकानांची वेळ वाढवा अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालू. शाळा, कॉलेज बंदच आहेत तसे हॉटेल्स, रेस्टॉरंट उद्योगाचीही वाताहत झाली.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा तडाखा अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त करूनही थांबलेला नाही.

तिसऱ्या लाटेची दहशत कायम आहे. लखनौमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट पोलिसांनी उधळून लावला तसे काही कोरोना लाटेबाबत करता येणार नाही. एक तर बेपर्वा लोकांवर दहशत निर्माण करून कोरोना निर्बंधांचे नियम पाळण्यास भाग पाडावे लागेल, नाहीतर लोकांनी स्वतःच नम्रपणे नियमांचा स्वीकार करून आणखी काही काळ जगावे लागेल. कोरोना आणि गर्दी यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचे गाठोडे मोठेच आहे. ते सुटायचे तेव्हा सुटेल, पण अतिरेक करून भागणार नाही इतकाच सल्ला आम्ही आज देऊ शकतो, अशा शब्दात सामनामधून हतबलता व्यक्त करण्यात आली आहे.

Updated : 13 July 2021 2:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top