Home > Coronavirus > औरंगाबादेत प्रत्येक 50 सेकंदाला आढळतोय कोरोनाबाधित रुग्ण

औरंगाबादेत प्रत्येक 50 सेकंदाला आढळतोय कोरोनाबाधित रुग्ण

औरंगाबादेत प्रत्येक 50 सेकंदाला आढळतोय कोरोनाबाधित रुग्ण
X

औरंगाबाद: देशात कोरनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढणाऱ्या पहिल्या 10 शहरांमध्ये औरंगाबाद जिल्हा सहाव्या क्रमांकावर आहे. तर प्रत्येक 50 सेकंदाला जिल्ह्यात एक कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या रुगणसंख्येने चिंता वाढवली आहे. राज्यात कमी झालेली कोरोनाची रुग्णसंख्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा वाढायला सुरवात झाली. मार्च महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात सुद्धा रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर मागील आठवड्यात रूग्णांची संख्या अचानक पणे वाढली असून,आता रोज पंधराशे च्या पुढे रुग्ण सापडत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार 702 रुग्ण आढळून आले. ज्यात शहर हद्दीतील 1 हजार 263 तर ग्रामीण भागातील 439 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक 50 सेकंदानंतर एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे.

प्रशासन सज्ज!

औरंगाबाद जिल्ह्यातील वाढती कोरोना रूग्णांची संख्या पाहता प्रशासन सज्ज झालं आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे आणि पोलीस आयुक्त निखील गुप्ता स्वतः रस्त्यावर उतरून आढावा घेत आहे. तर लोकांना बेड उपलब्ध मिळावे म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे.

तसेच शहरातील रुग्णालय फुल्ल असल्याने शहरातील मंगल कार्यालयांचा वापर कोविड सेंटरसाठी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 31 मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार असून त्याठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.

Updated : 25 March 2021 5:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top