Home > Coronavirus > कोविड लसीचे 'मिक्स-मॅच' धोकादायक का?

कोविड लसीचे 'मिक्स-मॅच' धोकादायक का?

कोविड लसीचे मिक्स-मॅच धोकादायक का?
X

कोरोना महामारीवर प्रभावी उपाय म्हणून 'मिक्स अँड मॅच' पद्धती वापरण्याचा जागतिक कल असताना वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशी अशा प्रकारे मिक्स करण्याचा ट्रेंड धोकादायक असल्याचं स्पष्ट मत व्यक्त करत जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organisation (WHO) प्रमुख वैज्ञानिक सोम्या स्वामीनाथन (Soumya Swaminathan) यांनी सावध केलं आहे. अशा प्रकारच्या उपचार पद्धतीबाबत कमी प्रमाणात डेटा उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केला आहे. त्यामुळे या पुढील काळातही

सगळ्यांनी खबरदारी घ्यायला हवी. अनेक देशांमध्ये लशींना 'मिक्स अँड मॅच' करुन वापरण्यात येत आहे. पण, अशा उपचार पद्धतीबाबत पुरेसा डेटा उपलब्ध नाही. यासंदर्भात अभ्यास सुरु आहे. त्यामुळे आपल्याला याबाबत आणखी वाट पाहावी लागणार आहे. अनेक देशात कोरोना प्रतिबंधक लशीचा पुरेसा साठा आहे. तरीही अशाप्रकारची उपचार पद्धत वापरली जात असेल तर आपल्याला विचार करण्याची गरज आहे. कारण, हे धोकादायक ठरु शकतं, असं सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केला आहे.

सौम्य्या स्वामीनाथन यांना बुस्टर डोसबाबत बोलताना त्या म्हणाल्या , लोकांना लशीचा दुसरा, तिसरा किंवा चौथा डोस केव्हा घ्यायचा हे नागरिक ठरवू लागल्यास गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते. आतापर्यंत चार देशांनी बुस्टर डोसचा कार्यक्रम राबवला आहे. इतर काही देश असं करण्याचा विचार करत आहेत. पण, अशा कार्यक्रमांमुळे आपल्याला अधिकचे 80 कोटी डोस लागू शकतील. सध्या असे काही देश आहेत, जेथे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना प्रतिबंधक लस मिळाली नाही.

दरम्यान, जगावरील कोरोना महामारीचे संकट अजून टळलेले नाही. 18.6 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 40 लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीचे संकट आणखी काही वर्ष आपल्यासोबत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून केले जात आहे.

स्वामीनाथन यांनी पुन्हा एकदा जगातील नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा इशारा दिला आहे. त्या म्हणाल्या, ' जरी तुम्ही लस घेतली असली तरीही कोविड-19 चा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्यामुळे इतरांपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत रहा. पण लसीकरणामुळे हॉस्पिटलायझेशन आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे हे मात्र नक्की. काही अभ्यासांतून असं लक्षात आलंय की लसीकरण न केलेल्यांच्या तुलनेत लसीकरण केलेल्या व्यक्तीला कोविड झाला तर तो कमी प्रमाणात विषाणूचा संसर्ग पसरवतो. लसीकरणाचा परिणाम आणि त्याचा संसर्ग पसरण्यावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास केला गेला पाहिजे.'

कोविड-19 ची लागण होऊ नये म्हणून ज्यांनी पूर्ण लसीकरण करून घेतलं आहे त्यांनाही जगभर डेल्टा व्हेरियंटची लागण होत आहे. पण लसीकरणामुळे त्यांची प्रकृती गंभीर आजारी होत नाही किंवा या नव्या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू होण्याचं प्रमाणही खूप कमी आहे, असही WHO च्या रिपोर्ट मध्ये म्हटले आहे.

Updated : 13 July 2021 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top