Home > Coronavirus > राज्यात पुन्हा कोविड विस्फोट: 55,469 नव्या रुग्णांची 24 तासात नोंद

राज्यात पुन्हा कोविड विस्फोट: 55,469 नव्या रुग्णांची 24 तासात नोंद

कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून रुग्ण संख्या वाढल्यामुळे चिंता निर्माण झालेला महाराष्ट्रात आज आज 55,469 करोनाबाधित वाढले तर 297 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात पुन्हा कोविड विस्फोट: 55,469 नव्या रुग्णांची 24 तासात नोंद
X

राज्यात करोनाचा संसर्गाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

तरी अनेक ठिकाणी राज्यात लॉकडाउन आणि निर्बंधांचा विरोध होत आहे. मात्र तरी देखील दररोज करोनाबाधित मोठ्या संख्येने आढळतच आहेत. राज्यात आज 55,469 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 34,256 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 25,83,331 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 4,72,283 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.98% झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०९,१७,४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३१,१३३५४ (१४.८८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,५५,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे एक महत्वपूर्ण मागणी केली आहे. कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून, आता या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचविणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षांपुढील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती त्यांनी केली.

शिवाय कोरोना लसीचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने महाराष्ट्राची पूर्तता करावी त्याचबरोबर ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने इतर राज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऑक्सिजन पूर्ती करावी अशीही मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Updated : 6 April 2021 4:53 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top