Home > Coronavirus > Covid19 सावधान परदेशात प्रवास करत असाल किंवा परदेशातून येत असाल तर हे वाचा...

Covid19 सावधान परदेशात प्रवास करत असाल किंवा परदेशातून येत असाल तर हे वाचा...

Covid19 सावधान परदेशात प्रवास करत असाल किंवा परदेशातून येत असाल तर हे वाचा...
X


गेल्या काही दिवसात कोरून विषाणूने पुन्हा एकदा आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहव. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या केसेस वाढायला सुरुवात झाल्यानंतर आता संपूर्ण जग सावध झाल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्शवभूमीवर भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जरी केली आहेत.भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जरी केलेल्या पत्रात अनेक सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पुढील आदेश येईपर्यंत पालन केले गेले पाहिजे असे निर्देश देखील या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.


आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबतचे काही नियम -


- आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे.

- सावधगिरी म्हणून उड्डाणापूर्वी आणि उड्डाणानंतर विमानात कोविड 19 आजाराबाबत आवश्यक सूचनांशी संबंधित घोषणा करण्यात याव्यात.

- प्रवासात प्रत्येक ठिकाणी मास्कचा वापर करणे अनिवार्य असेल.

- प्रवाशांनी शारीरिक अंतर पाळणे अनिवार्य असेल.

- प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास प्रोटोकॉल नुसार त्याला इतर प्रवशांपासून वेगळे केले जावे.

- प्रवास संपल्यानंतर लक्षणे आढळलेल्या प्रवाशाला त्वरित आयसोलेशन मध्ये स्थलांतरित करण्यात यावे.

- डी-बोर्डिंग करत असताना शारीरिक अंतर पाळले जावे.

- आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करावे.


असे काही आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबतच निःम सध्या आरोग्य विभागाने जारी केले आहेत. ज्या नियमांचे पालन करणे प्रत्येकासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्यास पुन्हा एकदा देशात मास्क सक्ती याशिवाय लॉककडाऊन लावण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Updated : 21 Dec 2022 6:40 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top