Home > Coronavirus > कोरोनाच्या संकटामुळे वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे

कोरोनाच्या संकटामुळे वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे

कोरोनाच्या संकटामुळे वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षे
X

कोरोना संकटात आरोग्य व्यवस्थेवरील वाढलेला ताण लक्षात घेऊन राज्यातील वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट- अ मधील व राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट अ मधील वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 62 वर्षापर्यंत वाढविण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची नितांत आवश्यकता आहे. त्यांचा अनुभव साथरोग नियंत्रणात महत्वाचा ठरु शकतो. याचा विचार करुन शासनाकडून वैद्यकीय अधिकारी गट अ आणि वरिष्ठ अधिकारी (वेतनस्तर एस-23 : 67700-208700 व त्यावरील) तसेच राज्य कामगार विमा योजनेतील महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट-अ (वेतनस्तर एस-20 : 56100-177500) यांचे निवृत्तीचे वय 31 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये एक वर्षासाठी 62 वर्षांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयास कार्योत्तर मंजुरी देण्याचा तसेच त्याअनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम 1982 मधील नियम 10 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Updated : 15 July 2021 4:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top