Home > Coronavirus > कोरोनाचा उच्चभ्रूंनाही विळखा; बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार झाला पॉझिटिव्ह

कोरोनाचा उच्चभ्रूंनाही विळखा; बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार झाला पॉझिटिव्ह

दुसऱ्या करोना लाटेने अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केल्यानंतर झोपडपट्टी पासून तर उच्चभ्रू वस्ती पर्यंत कोरोना पोचला आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार देखील कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे.

कोरोनाचा उच्चभ्रूंनाही विळखा; बॉलिवूडचा खिलाडी  अक्षय कुमार झाला पॉझिटिव्ह
X

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कालची एक्का दिवसातले आकडेवारी जवळपास पन्नास हजार रुग्णांपर्यंत पोचली होती.गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना कोरोनाने विळखा घातला आहे.सचिन तेंडुलकर वर ही कोरोनाचे उपचार सुरू असून आता यामध्ये पुन्हा एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

माझा आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. मात्र, माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे".


राज्यात कुठल्याही क्षणी कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता असून आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून रूग्णसंख्या अशीच वाढली, तर उपलब्ध असलेला ऑक्सिजनही पुरणार नाही अशी भीती व्यक्त केली. सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना काळात औद्योगिक विभागासाठी २० टक्के आणि सार्वजनिक आरोग्यासाठी ८० टक्के दिला जातो. मागील १५ दिवसात वाढणारे कोरोना रूग्ण पाहता आता तो १०० टक्के सार्वजनिक आरोग्यासाठी वापर केला जाईल, असे संकेतही या अधिकाऱ्यांनी दिले.

Updated : 4 April 2021 6:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top