Home > Video > कोव्हिड लसीचा महिलांवर साईड इफेक्ट होतो का?

कोव्हिड लसीचा महिलांवर साईड इफेक्ट होतो का?

कोव्हिड वॅक्सीनचे सर्वाधिक आणि गंभीर साईड इफेक्ट्स महिलांवर झाल्याचं वृत्त माध्यमांवर येत आहे. भारतात आणि परदेशात देखील या संदर्भात बातम्या छापून आल्या आहेत. मात्र, या बातम्यामध्ये तथ्य आहे का?

कोव्हिड लसीचा महिलांवर साईड इफेक्ट होतो का?
X

कोव्हिड वॅक्सीनचे सर्वाधिक आणि गंभीर साईड इफेक्ट्स महिलांवर झाल्याचं वृत्त माध्यमांवर येत आहे. भारतात आणि परदेशात देखील या संदर्भात बातम्या छापून आल्या आहेत. मात्र, या बातम्यामध्ये तथ्य आहे का? या संदर्भात अमेरिकेच्या सीडीसी (centre for disease control and prevention) ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोना वॅक्सीन दिलेल्या लोकांना सीडीसीने वॅक्सीन घेतल्यानंतर आपल्यावर झालेल्या साईड इफेक्ट्सची माहिती ऑनलाईन पद्धतीने नोंदवा असं अपील केलं होतं.

त्यानुसार दीड कोटी लोकांचे वॅक्सीन झाले. ६ हजार ९९४ लोकांनी वॅक्सीन घेतल्यानंतर आपल्या आरोग्याची नोंदणी या वेबपोर्टलवर केली होती. यात नोंद करणाऱ्या लोकांपैकी ६१.२ टक्के महिला आहेत. त्यात ७९.१ टक्के महिलांना वॅक्सीनचे साईड इफेक्ट्स झाल्याचं म्हटलं आहे.

कोरोनाच्या लसीचा खरंच महिलांवर साईड इफेक्ट्स झाला आहे का? वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्यांचा अर्थ काय? महिलांची रोगप्रतिकारशक्ती आणि वॅक्सीनचा काही संबंघ आहे का? कोरोना संदर्भातील या बातम्यांनी घाबरून जाऊ नका.. सत्त्यता समजून घेण्यासाठी पाहा डॉ. संग्राम पाटील यांचं महत्त्वपूर्ण विश्लेषण...

Updated : 17 March 2021 2:27 PM GMT
Next Story
Share it
Top