Home > Video > लोक भोंदू बाबाच्या जाळ्यात का ? आणि कसे फसतात ?

लोक भोंदू बाबाच्या जाळ्यात का ? आणि कसे फसतात ?

X

संत महात्म्यांनी लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला , त्यामुळे त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला कित्येकाना ठार मारण्यात आले . मात्र आजकाल संत महात्म्याचे , धर्माचे नाव घेत कुठलाही व्यक्ती भगवे वस्त्र घालतो आणि मी धर्म वाचवायला आलो आहे , माझ्यात दैवी शक्ती आहे ,

असे बोलून आपल्याला मूर्ख बनवतो , आपल्या मेंदूचे पाकिट मारून आपल्या खिश्यातले पाकिट कधी मारतो हे आपल्या उमजत नाही . काही बदमाश भोंदू बाबा आणि त्यांचे हस्तक घरातल्या लेकीबाळी पर्यंत पोचतात . हे सर्व आपल्या डोळ्या देखत घडते मात्र आपण काय करतो एक बाबा बदमाश निघाला तर दुसरा, तिसरा चौथा असे शोधत फिरतो . पण प्रश्न विचारत नाही, तर्क करत नाही , विज्ञानाच्या कसोटीवर तपासत नाही .

काय आहेत याच्या मागील कारणे ? अगदी उच्च शिक्षित व्यक्ती असो की बडे राजकारणी सर्व बाबा , बुवा साध्वी, माता च्या मागे का फिरत असतात ? का लोटांगण घालत असतात ? . काय आहे यामागील मानसशास्त्र ? जाणून घ्यायचे असेल तर MaxMaharashtra हे प्रतिनिधी किरण सोनवणे यांचा व्हिडिओ बघा..


Updated : 20 March 2023 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top