Home > Video > Special Report : आंदोलक शेतकऱ्यांना सरकारच्या हमीभावाच्या आश्वासनावर विश्वास का नाही?

Special Report : आंदोलक शेतकऱ्यांना सरकारच्या हमीभावाच्या आश्वासनावर विश्वास का नाही?

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला मुद्दा म्हणजे हमीभाव.... हमीभाव कायम राहणार आहे असे सरकार वारंवार सांगत आहे. पण तरीही शेतकऱ्यांचा त्यावर विश्वास नाहीये, याचे कारण काय हे शोधून काढण्यासाठी आमचे प्रतिनिजी शिवाजी काळे यांनी एका शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली.

Special Report : आंदोलक शेतकऱ्यांना सरकारच्या हमीभावाच्या आश्वासनावर विश्वास का नाही?
X

दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील सगळ्यात महत्त्वाचा ठरलेला मुद्दा म्हणजे हमीभाव.... हमीभाव कायम राहणार आहे असे सरकार वारंवार सांगत आहे. पण तरीही शेतकऱ्यांचा त्यावर विश्वास नाहीये याचे कारण आहे सरकारने जाहीर केलेला हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांचा हमीभावासाठी आग्रह आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला हरियाणामधल्या खट्टर गावातील रामनिवास या एका वृद्ध शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहोत, ज्याने सरकारच्या हमीभावावर विश्वास ठेवला आणि त्याला २४ हजार रुपयांचा फटका बसला.

ज्या शांता कुमार समितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने तीन शेतकरी सुधारणा कायदे आणले, त्याच शांता कुमार समितीच्या शिफारसीनुसार हरियाणाच्या मनोहरलाल खट्टर सरकारने पीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी बदल करावे यासाठी वृत्तपत्रात जाहिरात दिली. या जाहिरातीत "धान, गव्हाची लागवड न करता मका पिकाची लागवड करा. तुम्हाला प्रोत्साहन पर रक्कम म्हणून 7 हजार 500 रुपये मिळणार असे सांगितले होते.

तसेच १८५० रुपये दराने सरकार मका खरेदी करेल असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे रामनिवास यांनी मक्याची लागवड केली. पण सरकारचा हमीभाव त्यांना मिळालाच नाही उलट १८५० ऐवजी त्यांना १२०० रुपये भाव मिळाला. याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांना सरकारतर्फे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे यापुढे सरकारवर विश्वास ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Updated : 25 Dec 2020 12:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top