Home > Video > फडणवीसांचा फुगा!

फडणवीसांचा फुगा!

फडणवीसांचा फुगा!
X

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेलं भाषण गाजलं. या भाषणात त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या "मी पुन्हा येईन" या वाक्यावरून टीकेची झोड उठवली होती. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची हाव होती अशी टीका केली होती. त्यांच्या मला अजुनही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय या वाक्यावर शरद पवार यांनी टीका केली होती. शरद पवार यांच्या या टीकेला उत्तर देताना द्वेंद्र फडणवीस यांनी पवारांना सलग ५ वर्षे मुख्यंमंत्री पद राखता आलं नसल्याची टीका केली होती. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार तसेच उध्दव ठाकरे यांच्यातील वाकयुध्दाचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी...


Updated : 17 Oct 2021 3:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top