Home > Video > Exclusive : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भ्रष्टाचाऱ्यांना पाठींबा, सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट

Exclusive : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भ्रष्टाचाऱ्यांना पाठींबा, सत्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट

सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. नेमकं काय म्हणाले सत्यपाल मलिक? जाणून घेण्यासाठी वाचा....

X

सत्यपाल मलिक यांनी 'द वायर' (The Wire) ला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सत्यपाल मलिक (Satyapal Malik on Max Maharashtra) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सत्यपाल मलिक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा भ्रष्टाचाऱ्यांना पाठींबा आहे. ते नेहमी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात. एवढंच नाही तर मी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यानंतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यात प्रामुख्याने मी गोव्यातील प्रकरण निदर्शनास आणून दिले होते. मात्र पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही.

पंतप्रधान मोदी यांना भ्रष्टाचारी लोकांचं कुठलंच वावडं नाही. जोपर्यंत ते लोक त्यांची खुशमस्करी करत राहतील, असाही गौप्यस्फोट सत्यपाल मलिक यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केला.

Updated : 20 May 2023 3:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top