Home > Video > Exclusive: नवनीत राणा यांनी दर्शन घेतलेल्या हनुमान मंदीराबाहेरील व्यापारी महागाईने त्रस्त…

Exclusive: नवनीत राणा यांनी दर्शन घेतलेल्या हनुमान मंदीराबाहेरील व्यापारी महागाईने त्रस्त…

नवनीत राणा यांनी दर्शन घेतलेल्या हनुमान मंदीराबाहेरील व्यापारी महागाईने त्रस्त, पाहा मॅक्समहाराष्ट्राचे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांचा स्पेशल रिपोर्ट

Exclusive: नवनीत राणा यांनी दर्शन घेतलेल्या हनुमान मंदीराबाहेरील व्यापारी महागाईने त्रस्त…
X

सध्या हनुमान चालीसाचा मुद्दा माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आज दिल्लीतील कॅनाॅट प्लेस येथे अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पती रवी राणा यांच्या सोबत प्राचीन हनुमानाचे दर्शन घेतले. आणि हनुमान चालिसाचे पठन केले.

त्याच हनुमान मंदिराबाहेरील व्यवसायिकांशी मॅक्समहाराष्ट्राने चर्चा केली. दर शनिवारी मोठ्या प्रमाणात भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र आता या भक्ताचे प्रमाण कमी होत असल्याचं येथील व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. दर शनिवारी आणि मंगळवारी या ठिकाणी लोक येत असतात. मात्र, महागाईमुळे लोक कमी झाल्याचं व्यापारी सांगतात.






राजराणी नावाच्या एका महिला दुकानदारांशी आम्ही चर्चा केली. त्या म्हणाल्या… महागाई खूप वाढली आहे. तेल खूप महाग झालं आहे. शनिदेवाला वाहण्यासाठी लोक तेल विकत घ्यायचे. या अगोदर आमच्या २-३ पेट्या विकल्या जायच्या. पण आता परिस्थिती अशी आहे की, १ पेटी सुद्धा विकली जात नाही. लोकांकडे काम धंदे नाहीत. महागाई मुळे लोकांची आस्था कमी झाली नाही. दोन पैसे मिळवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही दुकान उघडुन बसतो. पण महागाईच एवढी झाली आहे की, लोक नाही तेल विकत घेत नाही. महागाई कमी झाली पाहिजे.

संजय शर्मा नावाच्या एका व्यावसायिक सांगतात, 80 रुपये लिटरने मिळणारं तेल 200 रुपयांवर आलं. मोदी सरकारने तेलाचे भाव डबल पेक्षाही जास्त वाढवले. लोक तेल विकत घेताना विचार करतात. असं मत संजय शर्मा व्यक्त करतात.





भोला नावाच्या एका फुल विक्रेत्याने सांगितलं की… महागाई वाढली तरी आम्ही आमचे भाव वाढवले नाहीत. कारण भाव वाढवले की लोक फुलं विकत घेत नाहीत. आणि जर फुलं विकत घेतली गेली नाही तर फुलं सुकुन जातील आणि आमचचं नुकसान होईल. त्यामुळे आम्ही फुलांचे भाव वाढवले नसल्याचं मत भोला ने व्यक्त केलं आहे.

कृष्णा शर्मा नावाचा एक केळी विक्रेत्या आजी म्हणाल्या… महागाई वाढल्यापासुन आमचा धंदा खूप कमी होत आहे. लोक केळी विकत घेत नाहीत. केळी विकत घेण्यापेक्षा आपलं घर चालवणं लोकांना महत्त्वाचं आहे. आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे बसतो पण आमची अजिबात कमाई होत नाही.





शर्मा नावाची केळी विकणाऱ्या आजी सांगतात… या ठिकाणी लोक गर्दीने दर्शनासाठी यायचे. पण आता खूप कमी लोक दर्शनासाठी येतात. महागाई इतकी वाढली आहे की, मुलांना सांभाळण मुश्किल झालं आहे. माझा नवरा सुद्धा वारला. त्यामुळे आमच्या घरात मी एकटीच कमवणारी आहे. आम्हाला कोणती पेन्शन सुद्धा मिळत नाही. महागाई कमी व्हायला हवी. असं मत शर्मा व्यक्त करतात.

जितेंद्र नावाचे एक गृहस्थ म्हणाले… काय कमवायचं आणि काय खायचं. कुठुन येणार भक्त. लोकांच्या हाताला काम धंदे नाहीत त्यामुळे लोक येत नाहीत. देवाच्या कृपेने दोन वेळची भाकरी मिळते.





असं जितेंद्र सांगतात…. गोपाल नावाच्या एका मिठाई वाल्याने म्हटलं, खुप वाईट परिस्थिती आहे. महागाई इतकी वाढली आहे की, चटणी भाकर सुद्धा मुश्किलीने मिळते. लोक मिठाई विकत घेत नाहीत. अशी परिस्थितीत देशातील अनेक मंदिराच्या बाहेर आहे.


Updated : 14 May 2022 2:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top