Home > Video > Video: मोटारमनची समय सूचकता, ब्रेक दाबले आणि वाचवले वृद्धांचे प्राण...

Video: मोटारमनची समय सूचकता, ब्रेक दाबले आणि वाचवले वृद्धांचे प्राण...

Video: मोटारमनची समय सूचकता, ब्रेक दाबले आणि वाचवले वृद्धांचे प्राण...
X

मुंबई मध्ये रेल्वे रुळ ओलांडताना अनेकांचा मृत्यू होतो. लोकांना कितीतरी वेळा पुलाचा वापर करा अशा सूचना दिल्या जातात. मात्र, लोक या सुचनांचं पालन करत नाहीत. त्यामुळं अनेकांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू होतो. अनेक वृद्ध लोकांना रेल्वे पुलाच्या पायऱ्या वर चढून जाणं शक्य नसते म्हणून ते रेल्वे रुळ ओलांडून जात असतात.

असाच एक वृद्ध व्यक्ती कल्याण मुंबई वाराणसी रेल्वेच्या खाली आला. मात्र, मोटरमनने वेळीच प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबले. आणि या वृद्ध व्यक्तीस गाडी खालून बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून सदर व्यक्ती वाचली. मोटरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या या समयसुचकतेचं सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात कोतुक केलं जात आहे.

Updated : 18 July 2021 11:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top