कोरोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेलेल 8 महिन्यांचे लॉकडाऊन आणि त्यात संस्थाचालकांच्या वादामुळे शिक्षकांचे पगार रखडल्याचा प्रकार डोंबिवलीत घडला होता. संस्थाचालकांच्या आपापसातील वादामुळे चक्क 10 महिने पगारापासून वंचित राहावे लागलेल्या, या पीडित शिक्षकांची व्यथा मॅक्स महाराष्ट्रने मांडली. त्याची दखल ठाणे जिल्हाधिकारी आणि धर्मदाय आयुक्तांनी घेऊन संस्था चालकांना शिक्षकांचे पागर त्वरित करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी म्हणजेच धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या शिक्षकांच्या खत्यात त्यांचा पगार जमा झाला. यावेळी त्यांनी पेढ़े वाटून आपला आनंद साजरा केला. या शिक्षकांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी....
Updated : 14 Nov 2020 2:00 PM GMT
Next Story