Home > Video > भारतीय चित्ता नामशेष कसा झाला?

भारतीय चित्ता नामशेष कसा झाला?

भारतीय चित्ता नामशेष कसा झाला?
X

या आठवड्यात भारतात आफ्रिकन का होईन पण चित्ता येणार आहे. पाच नर आणि ३ माद्या असे एकुण ८ चित्ते नामिबियातुन भारतात जयपुर येथे आणले जाणार आहेत. खरंतर हे चित्ते २०२१ मध्येच आणले जाणार होते परंतू कोरोना काळामुळे त्यांचं आगमन लांबलं होतं आणि आता अखेर ते भारतात आणले जाणार आहेत. तब्बल ५० वर्षांनंतर भारतात आफ्रिकन का होईना पण चित्ता परतणार आहे. परतणारा हा चित्ता भारतातून नामशेष कसा झाला होता. आज तेच जाणून घेणार आहोत.

असा झाला भारतीय चित्ता नामशेष!

आपण जर इतिहासात डोकावलं तर राजा महाराजांमध्ये चित्ते मारणं हे प्रतिष्ठेचं समजलं जायचं. त्यामुळे सर्रास चित्त्यांची शिकार केली जायची. चित्ता सर्वाधिक वेगाने पळणाऱ्या प्राण्यांपैकी एक आहे. ताशी ११० ते १२० किमी वेगाने तो पळू शकतो. १९४७ साली भारतात फक्त ३ चित्ते होते. मध्य़प्रदेशातील रामानुज प्रताप सिंह यांनी त्य़ा चित्त्यांची शिकार केली. शेवटचा चित्ता भारतात १९६७-६८ साली दिसल्याची नोंद झाली होती. पण त्या आधी जर पाहिलं तर भारतात १६ व्या शतकात १० हजार चित्ते होते आणि त्यातले १००० चित्ते हे मुघल सम्राट अकबराच्या दरबारात होते अशी नोंद स्वतः अकबराने केल्याचं आढळून येतं. १७९९ ते १९६८ या काळात भारतीय जंगलांमध्ये किमान २३० चित्ते होते असं संशोधनातून पुढे आलं आहे. पण खरं पहायला गेलो तर ब्रिटीशांच्या काळाच चित्त्यांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. शिवाय त्यांचं खाद्य असलेले प्राणी काळवीट, सांबर, ससे यांच्या प्रचंड प्रमाणात शिकार झाल्यामुळे ते देखील कमी झाले होते. मग चित्ते हे मानवी वस्त्यांमध्ये अन्न शोधण्यासाठी येउ लागले. यामुळे ब्रिटीश सरकारने बक्षिस देऊन चित्त्यांच्या शिकारीला परवानगी दिली होती. अशाप्रकारे चित्त्यांचं अस्तित्व संपुष्टात येऊ लागलं. अखेर आता पुन्हा एकदा भारतात चित्ते आणले जाणार आहेत.

भारतीय चित्ता नामशेष कसा झाला?

येत्या काही दिवसात भारतात तब्बल ८४०५ किमीचा प्रवास करून नामिबियामधून चित्ते आणले जाणार आहेत. मध्यप्रदेशमधील कुनो हे ७४० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं अभयारण्य चित्त्यांना अधिवास करण्यासाठी एकदम पुरक आहे. अभयारण्यातील ५० X ३० मीटरच्या क्षेत्रामध्ये या चित्त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आधी नरांना आणि मग कालांतराने मादी चित्त्यांना जंगलात सोडण्यात येणार आहे. या अभयारण्यामध्ये एकुण २० ते २४ चित्ते राहु शकतात. या अभयारण्यातील अधिकाऱ्यांना या चित्त्यांसाठी नामिबिया येथे नेऊन विशेष ट्रेनिंग देण्यात आलं आहे. भारत सरकारचा हा एक महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने देशभरातील सर्वांतचंच या प्रकल्पाकडे लक्ष लागलं आहे.

Updated : 15 Sep 2022 7:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top