Home > Video > कोरोनाच्या संकटात गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना

कोरोनाच्या संकटात गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भय असताना राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.​त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची ठेवण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटात गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना
X

गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपतींच्या मूर्तींवर उंचीची मर्यादा नको, आम्ही करोनाकाळातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी भूमिका घेतली होती. याबरोबरच तातडीने गणेशोत्सवाबाबतचे सरकारचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. गणेशोत्सवाला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राज्य सरकारने कोणतेही धोरण जाहीर न केल्याने गणेशमूर्ती तयार करण्याचे कामही अद्याप सुरू करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मूर्तीकार आणि मंडळांनी सरकारला तातडीने धोरण जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.



काय आहेत गृहविभागाच्या सूचना:

गणेशोत्सवासाठीच्या गाईडलाईन्स

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.

सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती 4 फूट तर घरगुती गणपती 2 फुटांचा असावा.

गणपती आणताना वा विसर्जनासाठी मिरवणूक काढता येणार नाही.

शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी आणि या मूर्तीचं घरच्या घरी वा कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात यावं.

नागरिक देतील ती देणगी मंडळांनी स्वीकारावी. मंडप परिसरात गर्दी होऊ देऊ नये.

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम सार्वजनिक मंडळांनी राबवावेत.

आरती, भजन, कीर्तन करताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी.

नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी वेबसाईट, ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुकद्वारे दर्शनाची सोय करावी.

गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी.

विसर्जनाआधीची आरती घरीच करून, मग मूर्ती थेट विसर्जनासाठी आणावी.

एकाच इमारतीतल्या अनेक घरगुती गणपतींची एकत्र विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.

Updated : 29 Jun 2021 1:43 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top