Home > Video > कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी धोरण जाहीर करा – हेरंब कुलकर्णी

कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी धोरण जाहीर करा – हेरंब कुलकर्णी

कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी धोरण जाहीर करा – हेरंब कुलकर्णी
X

गेल्या दीड वर्षापासून देशभरात कोरोना महामारीने मानवी जीवनाची उलथा-पालथ करून ठेवली आहे. अद्यापही कोरोना व्हायरसने आपल्यातून एक्झिट घेतली नाही. या महामारीत अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यात अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. या सगळ्या परिस्थितीत राज्यभरात 20 हजारांपेक्षा अधिक महिला विधवा झाल्या आहेत. त्यांच्यावर आर्थिक संकंट कोसळलेलं आहे.

त्यांच्या पुनर्वसानाचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे राज्यातलं ठाकरे सरकार आणि केंद्र सरकार कधी लक्ष देणार ? कधी मिळणार कोरोना विधवांना मदत? काय आहेत कोरोना विधवांच्या समस्या? या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यासह राज्यातील 150 पेक्षा अधिक संस्थांनी ऑनलाईन आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळी 1400 इमेल्स केले आहेत. लवकरात लवकर कोरोना विधवांच्या पुनर्वसनासाठी धोरण जाहीर करा अशी मागणी या आंदोलनाच्या निवेदनात करण्यात आली आहे. पाहा हेरंब कुलकर्णी यांच्या हा व्हिडिओ...

Updated : 16 July 2021 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top