देशभरात विविध शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत काम सुरु आहे. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरात देखील स्मार्ट सिटी चे काम सुरु आहे. मात्र, या योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. त्यामुळं नगरपालिकांना मोठा फटका बसत आहे. तसंच स्मार्ट सिटी योजनेची कामं ठराविक कंपनीलाच दिली जात असल्याचा आरोप देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
त्यामुळे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या कामांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय कमिटी नेमण्याची मागणी आज लोकसभेत केली आहे..
Updated : 13 Feb 2021 12:08 PM GMT
Next Story