Top
Home > Video > Video: माजी आमदाराच्या मुलाची ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण

Video: माजी आमदाराच्या मुलाची ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण

Video: माजी आमदाराच्या मुलाची ऑन ड्युटी डॉक्टरला मारहाण
X

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्याच्या मुख्यालय स्थळी असणाऱ्या कोव्हिड सेंटरमधील नोडल अधिकारी डॉ अभिजित मारबत यांना माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या मुलाचं नाव लॉरेन्स गेडाम असून याने ऑन ड्युटी असणाऱ्या नोडल अधिकाऱ्यास मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

याबाबत डॉ अभिजित मारबत यांच्याशी संपर्क केला असता ते रात्री उशिरापर्यंत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याच्या कामी व्यस्त होते.

डॉ मारबत हे गेल्या दोन वर्षापासून दुर्गम समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा देत आहेत. माजी आमदार पुत्राकडून त्यांना झालेली मारहाण निषेधार्ह असून याविरुद्ध जिल्ह्यातील डॉक्टर्स यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे. आता या मारहाणीचे तीव्र पडसाद राज्यात उमटण्याची चिन्हे आहेत.

या प्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता असून पोलिसांनी याबाबत कठोर पावले उचलावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे

Updated : 12 May 2021 6:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top