Home > Video > जगाला मानवतेच्या एकोप्याची गरज – श्रीपाल सबनीस

जगाला मानवतेच्या एकोप्याची गरज – श्रीपाल सबनीस

जाती-धर्मातला संघर्ष ‘मानवता’ नष्ट करण्याच्या दिशेनं नेतोय का? एकात्मकतेचं तत्वज्ञान कसं पेरावं? जगातील द्वेषमय वातावरण कसं बदलावं? जाणून घ्या साहित्य संस्कृती अभ्यासक श्रीपाल सबनीस यांच्याकडून...

जगाला मानवतेच्या एकोप्याची गरज – श्रीपाल सबनीस
X

सध्या जगभरात जाती-धर्मातला संघर्ष पाहत असताना मानवतेच्या एकोप्याचा विचार धुसर झालाय की का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अफगाणिस्तानवर धार्मिक कट्टरतावादी संघटना तालिबानने ताबा मिळवला आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे.

मानवतेची भावना कमी असल्यामुळे लोकांमध्ये तालिबानी दहशत पसरली आहे. भारतात जात-धर्माचा संघर्ष हळूवार पद्धतीने डोकं वर काढून लागला आहे. जगभरात सुरु असलेला जात,धर्म,वंश या भेदाचा संघर्ष मानवतेला नष्ट करण्याच्या दिशेने नेऊ लागला आहे का?

मोहम्मद पैगंबर ते येशू ख्रिस्तांचे विचार द्वेष, हिंसा न मानणारे असून मानवतेच्या एकोप्याला धरून ठेवणारे आहे. या विचारांचा विसर जगभरातील लोकांना पडला आहे. तो पुन्हा एकदा नव्यानं रुजवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यावर साहित्य संस्कृती अभ्यासक श्रीपाल सबनीस यांचे विचार करायला लावणारे विश्लेषण नक्की पाहा...

Updated : 16 Aug 2021 3:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top