Home > Video > किती जटील आहे कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचा प्रश्न?

किती जटील आहे कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचा प्रश्न?

किती जटील आहे कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचा प्रश्न?
X

सरकार जसे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन देते, तसे प्रोत्साहन विधवा महिलेसोबत तिच्या मुलासह पुनर्विवाह करणाऱ्या जोडप्याना ही सरकारने विशेष प्रोत्साहन निधी द्यावा. जेणेकरून कमी वयात विधवा होणाऱ्या एकल महिलांचा प्रश्न सुटेल, अशी मागणी महाराष्ट्रातील सुमारे 65 सामाजिक संघटनाच्या मदतीने कोरोना काळात विधवा झालेल्या एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणारे साहित्यिक, कवी, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सुमारे 7,000 कोरोना काळातील विधवा सध्या हेरंब कुलकर्णी यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या प्रश्नावर व त्यांनी केलेल्या कामावर, नुकताच त्यांनी कार्यअहवाल प्रकाशित केला आहे. काय आहे या अहवालात या अनुषंगाने त्यांच्या सोबत मॅक्स महाराष्ट्र ने संवाद साधला..

Updated : 9 March 2023 12:59 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top