Home > Video > कोरोना काळात सुया घे बिबा घे गं माय... म्हणणारे काय खात असतील?

कोरोना काळात सुया घे बिबा घे गं माय... म्हणणारे काय खात असतील?

कोरोना काळात सुया घे बिबा घे गं माय... म्हणणारे काय खात असतील?
X

कोरोनाचा फटका बसलेला एकही भाग नसेल. मात्र, ज्याचं हातावरचं पोट असेल त्यांनी काय करायचं? अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका भटक्या विमुक्त समाजातील वैदू समाजाची वस्ती आहे. पुर्वी या वस्तीचं नाव वैदुवाडी असं होतं. आता या वस्तीचं नामकरण यशवंतनगर असं करण्यात आलं आहे. ही वाडी संगमनेर खुर्द या भागात मोडते.

वैदू समाज हा हातांवर पोटभरणारा समाज आहे. डब्बे,चाळण,सुपडे, आठवे असा व्यवसाय पुरुष मंडळी करतात. तर स्त्रिया लोकांच्या दारोदार फिरुन सुया, दोरा, फनी, कंगवे, दाभण,टिकल्या,मणी, केसांवर फुगे, केसांवर भांडी असं विकायचं काम करतात.

दररोज फिराल्याशिवाय त्यांच्या पोटाची वीत भर पोटाची टिचभर खळगी भरत नाही. ते पहिले शिकार करुन आपले जिवन जगत होते. आता काळ बदलला आहे. त्यामुळे ते आपले व्यवसाय करुन जीवन जगतात.

वैदू कुटुंबाचं वैशिष्ट म्हणजे ही कुटूंब एकत्रित पद्धतीने राहतात. एका कुटुंबात पाच स्त्रिया आणि पाच पुरुष असतील. तर त्यापैकी एक नवरा बायकोच फक्त घरी आपल्या लहान मुलांना सांभाळण्यासाठी असतात. बाकीचे सर्व फिरायला जातात. हे लोक उदरनिर्वाहासाठी विशेषतः मुंबई,कोतुळ,राजुर, धामणगाव, अशा विविध ठिकाणी जात असतात. हे कुटूंब घरापासून तीन तीन महिने लांब असतात.

मात्र, कोरोना आल्यापासून लोकांची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव(रोग) झाल्यापासून या लोकांचा पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकांच्या दारोदार फिरुन आपला व्यवसाय करणाऱ्या लोकांना आता कोरोनामुळं लोक घरासमोर उभं करत नाही.

सुया घे बिबा घे गं माय...

असा आवाज करत वाड वस्त्यावरुन फिरणारा हा समाज कोरोनामुळं बंदीस्त झाला आहे. पोटाच्या आगीने लोक आता बाहेर पडले तर लोक आता काही वस्तू घेत तर नाहीच. हाकलून लावतात. कुठेही फिरु दिले जात नाही. आणि गेले तरी गावातून हाकलून लावलं जातं.

कोरोना काळात काही लोक धाडस करुन बाहेर पडले. मात्र, कोरोनाची लागण झाल्यानंतर पुरेसा पैसा नसल्याने हे लोक स्वत:चे जीव वाचवू शकले नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वैदूवाडी येथे एकाच कुटुंबातील तीन लोकांचा कोरोनामुळे जीव गेला. महाराष्ट्रातील प्रत्येक वाडीतून पाच दहा लोकांचा जीव गेला पण या लोकांकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना नेत्यांचं.

या संदर्भात आम्ही वैदू समाजातील दुर्गूबाई शिंदे यांच्याशी बातचीत केली. त्या घरउपयोगी चाळण्या, छोटी भांडे विकण्याचं काम करतात. त्या सांगतात मी कटलेरी मालाचा धंदा करते. कोरोना काळात आम्हाला काही बाहेर जायला जमत नाही. आमची लेकर बाळ उपाशी आहेत. आता पुढंच काहीच कळत नाही. आम्ही अन्न पाण्याला तरसलो आहोत. आम्ही शेतकरी नाहीत. आम्ही हातावरचे आहोत. आम्हाला काही तरी मदत करायला पाहिजे. आम्हाला शेती वैगरे काही नाही...

हे असा कटलरी माल विकतो आम्ही...

सरकारने आम्हाला मदत करावी... काही तरी अनुदान द्यावं. महिना दीड महिना झाला आम्ही घरी आहोत...

पोट भरायचा आमचा व्यवसाय आता बंद आहे. आम्ही कसं खायंचं आणि कसं जगायचं? असा सवाल दुर्गा शिंदे मॅक्समहाराष्ट्रशी बोलतात.

तिथं उभं असलेला टोपी वाले काका सांगतात...

आमचं सरकारला एकच सांगणं आहे.. धंदे नाही पाणी नाही. सगळं बंद आहे. सरकारकडून आम्हाला अन्नदान मिळावं.

असं काका सांगतात.

एकंदरीत वैदू समाजाचा पोटा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने या मुलांच्या पोटा पाण्याच्या प्रश्नांवर लक्ष देणं गरजेचं आहे.

Updated : 11 May 2021 9:19 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top