Home > Video > भाजपचं मिशन मुंबई;महापौर भाजपचाच !

भाजपचं मिशन मुंबई;महापौर भाजपचाच !

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक (Mumbai Municipal Corporation)इतर पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईचा दौरा केला. या दौऱ्या गणपतीदर्शनाबरोबरच मुंबई मनपा जिंकून महापौर बसवण्याचा विडा उचलला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे १५० नगरसेवक निवडणुक आणण्याचा प्रण शहांनी केला आहे.

भाजपचं मिशन मुंबई;महापौर भाजपचाच !
X

मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक (Mumbai Municipal Corporation)इतर पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. देशाच्या गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुंबईचा दौरा केला. या दौऱ्या गणपतीदर्शनाबरोबरच मुंबई मनपा जिंकून महापौर बसवण्याचा विडा उचलला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे १५० नगरसेवक निवडणुक आणण्याचा प्रण शहांनी केला आहे.

ज्या ठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार विजयी झाले आहेत किंवा ज्या ठिकाणी भाजपचे (BJP) उमेदवार विजयी झाले आहेत, ज्या उमेदवारांना आपला मतदार संघ हा पारंपरिक आहे असं वाटत होतं, त्या उमेदवारांसाठी मात्र यंदाची महानगरपालिका निवडणूक जड तर जाणारच आहे मात्र पाच वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीपेक्षा धक्कादायक निकाल असणार आहेत एवढं मात्र नक्की आहे.

यावर्षीच्या महानगरपालिकांचा निकाल सगळ्यांसाठी धक्कादायक असणार आहे. कारण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून त्याचा फटका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आतापासूनच सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असली तरी जिंकणार कोण हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

दिवाळीच्या सुमारास महापालिका निवडणूक लागेल असा अंदाज आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षाकडून महापालिका निवडणुकीची (Municipal Election) जोरदार तयारी सुरु आहे. सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु आहे. मात्र, मुंबई महापालिकेसाठी राजकीय पक्ष इतका जोर का लावतात? त्याची काही कारणं आहेत.

एकट्या मुंबई महापालिकेच बजेट पाहिलं तर देशातील तीन ते चार राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशचं बजेट 22 हजार कोटीचं होतं. गोव्याचं बजेट 21 हजार कोटी आणि त्रिपुराचं बजेट 21 हजार कोटी रुपये आहे. तर एकट्या मुंबई शहराचं बजेट 39 हजार कोटी रुपये इतकं आहे.

मुंबई महापालिकेचं बजेट 39 हजार कोटी रुपये आहे आणि महापालिकेच्या ठेवी जवळपास 80 हजार कोटी रुपये आहेत. या दोन्ही रकमा एकत्र केल्या तर एकटी मुंबई अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, गोवा, मणिपूर, मिझोराम, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि उत्तराखंड अशा 12 राज्यांपेक्षा अधिक आहे.

देशातील सर्वाधिक कर देणारे पहिले 5 श्रीमंत व्यक्ती एकट्या मुंबईतील आहे. 2019 च्या आकडेवारीनुसार भारतातल्या अब्जाधीशांची संख्या 1 हजार 947 इतकी होती. त्यापैकी एकट्या मुंबईतील अब्जाधीशांचा आकडा 797 इतका होता.आर्थिक वर्ष 2020 – 21 मध्ये कर देणाऱ्या शहरांमध्ये एकट्या मुंबईने वन थर्ड वाटा उचलला होता. देशाच्या तिजोरीत भर टाकण्यात महाराष्ट्र महाराष्ट्र आणि मुंबई जवळपास अर्धा वाटा उचलतात.

गुजरातची ओळख व्यापाऱ्याचं राज्य म्हणून आहे. मात्र टॅक्स भरण्यात गुजरात मागे राहिलं. देशातील 32 राज्यातून फक्त 30 ठक्के टॅक्स जमा होता. केंद्र सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात फक्त महाराष्ट्र आणि दिल्ली या दोनच राज्यांचा वाटा 50 टक्के आहे.2018 – 19 च्या आकडेवारीनुसार गुजरातमधून केंद्र सरकारला कराच्या रुपात 49 हजार 21 कोटी रुपये गेले. तामिळनाडूतून देशाच्या तिजोरीत 74 हजार कोटी गेले. कर्नाटकातून 1 लाख 20 हजार कोटी आणि महाराष्ट्रातून तब्बल 4 लाख 25 हजार कोटी रुपये कराच्या रुपातून केंद्र सरकारला मिळाले.

महाराष्ट्र आणि मुंबईचं अर्थकारण देशाच्या हिशेबातून वजा केलं तर संपूर्ण देशच डबघाईच्या खाईत लोटला जाईल. मुंबई भौगोलिकदृष्ट्या एक शहर आहे. मात्र कराच्या दृष्टीनं तेच एक शहर देशाच्या आर्थिक गाडा हाकतोय. प्रत्येक राजकारण्यांना मुंबईची सत्ता का हवीहवीशी वाटते, याचं उत्तर मुंबईच्या याच अर्थकारणात दडलंय. दिल्लीतून देशाची सूत्रं हातात घेता येतात, मात्र देश चालवणाऱ्या तिजोरीसाठी जी हुकमी चाबी लागते, ती चाबी म्हणजे ही मुंबई आहे.

मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत अमित शाह यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उधळला.

जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेखही केला. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली असं शाह म्हणाले. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असंही शाह यांनी भाषणामध्ये म्हटलं.

राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही असा थेट संदेश अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे असंही शाह म्हणाले. महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारणं आपल्याला संपवायचं आहे, असंही अमित शाह यांनी आपल्या भाषणात म्हटलं. मोदी, फडणवीसांच्या नावाने मतं मागून तुम्ही जिंकलात आणि विश्वासघात केला. तुमचा पक्ष आज छोटा झाला यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, असंही शाह यांनी उद्धव ठाकरेंना ऐकून दाखवलं आहे.

Updated : 5 Sep 2022 2:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top