Home > Video > जयंती विशेष:अण्णाभाऊंच्या वाटेगावातून मँक्स महाराष्ट्र

जयंती विशेष:अण्णाभाऊंच्या वाटेगावातून मँक्स महाराष्ट्र

जयंती विशेष:अण्णाभाऊंच्या वाटेगावातून मँक्स महाराष्ट्र
X

तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या व्यक्तीने मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले

तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.आज अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी मँक्स महाराष्ट्र वाटेगावात पोचलं.. महान साहित्यिकाच्या जीवनावर जन्मगावातून प्रतिनिधी विजय गायकवाड आणि अजिंक्य अडतेंनी टाकलेला प्रकाश....

Updated : 31 July 2021 5:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top