Home > Tech > Facebook ची मालक कंपनी Meta देणार Twitter ला टक्कर, नव्या Text Sharing प्लॅटफॉर्मवर काम सुरु

Facebook ची मालक कंपनी Meta देणार Twitter ला टक्कर, नव्या Text Sharing प्लॅटफॉर्मवर काम सुरु

एलन मस्क (Elon musk) यांनी ट्विटर ताब्यात घेताच अनेक मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्यापार्श्वभुमीवर फेसबुकची मालक कंपनी मेटानेही ट्विटरविरुध्द ताकदीचा प्रतिस्पर्धी बनण्यासाठी कंबर कसली आहे.

Facebook ची मालक कंपनी Meta देणार  Twitter ला टक्कर, नव्या Text Sharing प्लॅटफॉर्मवर काम सुरु
X

Facebook Meta : एलन मस्क (Elon musk) यांनी ट्विटरचा (Twitter takeover) ताबा घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे फेसबुकसारख्या इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यातच आता फेसबुकची (Facebook)मालक कंपनी मेटानेही (Meta) टेक्स्ट शेअरिंग प्लॅटफॉर्म (Text Sharing platform) निर्माण करून ट्विटरला प्रतिस्पर्धी निर्माण करण्यासाठी कंबर कसली आहे. यासंदर्भात मेटाने शुक्रवारी माहिती दिली.

एलन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटरचा ताबा घेतला. त्यानंतर अनेक निर्णय घेतले आहेत. त्यातच कर्मचाऱ्यांची कपात, कंटेंटवरील नियंत्रणाचा अभाव आणि प्रभावशाली वेबसाईटचे आऊटेज यांमुळे अनेक जाहिरातदार कंपन्यांनी ट्विटरवरून पळ काढला आहे. मात्र आतापर्यंत ट्विटरला समर्थ पर्याय समोर आला नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील नेते, राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रेटी आणि विविध कंपन्या यांना लोकांशी संवाद सुरु ठेवण्यासाठी ट्विटरचाच वापर करावा लागत आहे.

मनी कंट्रोल (Moneycontrol.com) च्या रिपोर्टनुसार मेटाने सांगितले की, फेसबुकची मालक कंपनी मेटाने एका टेक्स्ट शेअरिंग प्लॅटफॉर्मवर काम सुरु केले आहे.

मेटाने केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टेक्स्ट शेअरिंगसाठी आम्ही स्वतंत्र आणि विकेंद्रित सोशल मीडिया नेटवर्कवर काम करीत आहोत. यामध्ये आम्हाला विश्वास आहे की, क्रिएटर आणि सोशल व्यक्तीमत्वांना त्यांच्या महत्वाच्या अपडेट आमच्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी संधी मिळणार आहे.



Updated : 11 March 2023 2:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top