Home > Sports > हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समधे परतणार ?

हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समधे परतणार ?

हार्दिक पांड्या पुन्हा मुंबई इंडियन्समधे परतणार ?
X

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी 19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार असल्याची चर्चा आहे.पण यावेळी संघांनी ट्रान्सफर विंडो ओपन केली आहे.या अंतर्गत दोन फ्रेंचाइसी एकमेकांच्या सहमतीने आवडीचे खेळाडू एकमेकांना ट्रेड करू शकतात.पण यासाठी खेळाडूंची परवानगी घेणंही महत्त्वाचं असतं.या अंतर्गत मुंबईच्या टीममधे हार्दिक पांड्याची एन्ट्री होऊ शकते.या बातमीला सहमती नसली तरी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

हार्दिक पांड्या याने २०१५ मधे मुंबई इंडियन्सच्या संघात आपल्या आयपीएल करिअरला सुरवात केली.तो तब्बल सहा वर्ष मुंबई इंडियन्स या संघात खेळला व त्यानतंर तो गुजरात टायटन्स या संघाचा कर्णधार झाला.त्याने गुजरात टायटन्स या संघाला पहिल्याच वर्षी आयपीएल २०२१ हा चषक मिळवुण दिला. हार्दिक पांड्या याची ट्रेडींग रक्कमे नुसार असेल यासाठी मुंबई इंडियन्स हा संघ गुजरात टायटन्स या संघाला १५ कोटी रूपये देईल.

Updated : 26 Nov 2023 1:05 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top