Home > Sports > सचिनच्या ताटात नेमके काय? जरा ओळखा बरे...

सचिनच्या ताटात नेमके काय? जरा ओळखा बरे...

भारतरत्न (BHARAT RATNA ) सचिन तेंडूलकर (SACHIN TENDULKAR ) याने सर्वांना होळीच्या (HOLI 2023) शुभेच्छा देत...सर्वांना एक प्रश्न विचारला आहे. सोशल मिडीयावर सर्वाधिक अँक्टिव राहणाऱ्या सचिन ने आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये त्याने पांढरा शुभ्र असा कुर्ता परिधान केला आहे. आणि चेहऱ्यावर रंग लागलेला पाहायला मिळत आहे. त्या आपल्या हातात एक ताट घेतले आणि चाहत्यांना प्रश्न विचारला आहे की, माझ्या ताटात काय आहे?

सचिनच्या ताटात नेमके काय? जरा ओळखा बरे...
X

आजही ज्याला जगभरात क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. ज्याचा भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. असा आपल्या सर्वांचा लाडका सचिन तेंडूलकर (SACHIN TENDULKAR ) सध्या आपली निवृत्तीचे दिवस एन्जॉय करताना आपण विविध ठिकाणी पाहत असतो. कधी तो आपल्याला एखाद्या गावात फिरताना दिसतो, कधी इडली खाताना दिसतो तर कधी एखाद्या महामार्गावर थांबून पहाटेचा टपरीवरचा चहा पिताना दिसून येतो. त्याचप्रमाणे आज त्याने आपल्या चाहत्यांना ट्विटवरुन होळी (HOLI 2023) सणाच्या शुभेच्छा दिल्या. त्यासोबतच त्याच्या हातात एक ताट आणि वाटी पाहायला मिळाली. या माझ्या हातातील ताटात काय आहे, असा प्रश्न त्याने आपल्या चाहत्यांना विचारला.

सचिनने हे ट्विट (TWITTER) करताच त्याच्या चाहत्यानी त्या ट्विटला (TWITTER) भरभरुन प्रतिसाद दिला. आणि जवळपास सर्वांनी सचिनच्या ताटात पुरणपोळी असल्याचे उत्तर दिले. तर खरोखरच सचिनच्या हातातील ताटात पुरण पोळीच असल्याचे दिसून आले. एका चाहत्याने उत्तरादाखल ट्विट करत होळी रे होळी पुरणाची पोळी, अशी कमेंट केली. तर काही चाहत्यांनी सचिनच्या हातात असलेल्या ताटात पंजाबी पराठा आणि दहीची वाटी असल्याचे सांगितले. सचिन सध्या आपल्या कुटुंबासोबत आपले सण- उत्सव साजरे करताना पाहायला मिळत आहे. सचिनचा हा फोटो आणि त्याचे ट्विट (TWITTER ) सध्या खूप व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.

Updated : 7 March 2023 2:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top