Home > Sports > विराट यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार

विराट यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार

विराट यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार
X

मुंबई : आयपीएल 2021 च्या उर्वरीत पर्वाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवशी भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी ट्वेण्टी वर्ल्ड कपनंतर टी ट्वेण्टी संघाच्या कर्णधारपद सोडणारअसल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच दिली असताना आता विराटने आरसीबीचे कर्णधारपदही सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे.यंदाच्या आयपीएलनंतर विराट आरसीबीचे कर्णधार पद सोडणार आहे.

आज कर्णधार विराटचा आरसीबीसाठी 200 वा सामना असणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधीच विराटने कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. आरसीबीच्या अधिकृत ट्विटरवरून ही पोस्ट करण्यात आली आहे. याबाबत विराटने व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

विराटने त्याचं कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली असली तरी यावेळी त्याने 'मी माझा शेवटचा आयपीएल सामना खेळेपर्यंत आरसीबी संघ सोडणार नाही' हे देखील स्पष्ट केलं आहे.

Updated : 20 Sep 2021 4:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top