Home > Sports > T20 world cup 2021: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणं होणं गरजेचं

T20 world cup 2021: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणं होणं गरजेचं

T20 world cup 2021: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला आजचा सामना  मोठ्या फरकाने जिंकणं होणं गरजेचं
X

मुंबई : T20 world cup 2021मध्ये भारतीय क्रिकेट संघाने अतिशय सुमार कामगिरी केली आहे, सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला असून, पुढील फेरीच्या भारताच्या आशा जवळपास मावळल्यात जमा आहे. मात्र, आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्यास भारताला गुणतालिकेत फायदा होऊ शकतो. त्यामुळे अजूनही भारताला स्पर्धेत टिकण्याची संधी आहे. तर भारत पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे आजचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

दरम्यान भारताची संभाव्य टीममध्ये विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी असू शकतात तर, स्कॉटलंड संघात जियॉर्ज मुन्से, कायल कोटजेर, मॅथ्यू क्रॉस, रिची बरीग्टंन, कॅलम मॅकलियॉड, मायकल लिस्क, ख्रिस ग्रेव्ह्स, मार्क वॅट, सॅफयन शरीफ, अलासदीर इवान्स, ब्रॅडली व्हिल यांचा समावेश असू शकतो.

भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ 4 पैकी 4 सामने आधीच जिंकून सेमीफायनलच्या लढाईत पोहोचला आहे. आता या गटातून आणखी एक कोणता संघ जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासाठी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे, तर भारताला आजच्या आणि नामिबीयाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. तसंच न्यूझीलंडने भारताला मात दिली असल्याने न्यूझीलंडला अफगाणिस्तानने मात दिल्यास भारत न्यूझीलंडच्या पुढे जाईल. त्यात नेट-रनरेट एक मोठी गोष्ट असल्याने भारताला आजचा सामना मोठ्या फरकाने जिंकणं आवश्यक आहे.

Updated : 5 Nov 2021 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top