Home > Sports > भारतीय संघाने न्यूझीलंड विरोधातील टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली

भारतीय संघाने न्यूझीलंड विरोधातील टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली

भारतीय संघाने न्यूझीलंड विरोधातील टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली
X

रांची : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या विक्रमी शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडला ७ गडी राखून पराभव केला. या शानदार विजयासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील अखेरचा सामना उद्या रविवारी कोलकाता येथे खेळविण्यात येईल. स्फोटक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद १५३ धावांत रोखल्यानंतर भारताने १७.२ षटकांत ३ बाद १५५ धावा करत सहज बाजी मारली.

राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकत ४९ चेंडूंत ६५ धावा काढताना ६ चौकार व २ षटकार मारले. तर कर्णधार रोहितनेही त्याला शानदार साथ देत ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार ठोकताना ५५ धावा केल्या. दोघांनी ११७ धावांची जबरदस्त सलामी देत भारताचा विजय निश्चित केला. तर दोघे बाद झाल्यानंतर ॠषभ पंत १२ धावांवर नाबाद आणि व्यंकटेश अय्यरने नाबद १२ करत भारताचा विजय साकारला. न्यूझीलंडकडून तिन्ही बळी कर्णधार टिम साऊदीने घेतले.त्याआधी, मार्टिन गुप्टिल व डेरिल मिशेल यांनी स्फोटक सुरुवात करून दिल्यानंतरही न्यूझीलंडची वाटचाल मर्यादित धावसंख्येत रोखली गेली. भारतीयांनी पॉवर प्लेनंतर शानदार पुनरागमन करत किवींच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Updated : 20 Nov 2021 2:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top