Home > Sports > Team India ; पराभवानंतर देशात निराशेचे वातावरण

Team India ; पराभवानंतर देशात निराशेचे वातावरण

Team India ; पराभवानंतर देशात निराशेचे वातावरण
X

भारतीय संघाचा (Team India ) रविवारी वनडे वर्ल्ड कप 2023 (#Worldcupfinal2023) च्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium)अंतिम सामना रंगला होता. या खेळात ऑस्ट्रेलियाने (Australia) 42 चेंडू आणि 6 विकेट राखून टीम इंडियावर (India)विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलली. भारतीय संघाला तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच स्वप्न अर्धवट राहील. या खेळाचा पराभव सर्व खेळाडूंन सह देशातील नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. पराभव झाल्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण खूपच भावनात्मक झालं होतं. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली. त्यांच मनोबल, उत्साह वाढवला. वर्ल्ड कप फायनल हरल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माच्या(Rohit Shrama ) डोळ्याच अश्रू अनावर झाले होते. विराट कोहलीच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. विराट प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्काराचा मानकरी ठरला. पण, तो प्रेजेंटर रवी शास्त्री यांच्याशी एकही शब्द न बोलता खाली निघून गेला.

देशातील अनेकांनी एक्स पोस्ट करत टीम इंडियाला सपोर्ट केला केला. तर अनेकांच्या डोळ्यातून अश्रू अनावरणाचे व्हिडीओ, फोटो व्हायरंलं झाले आहेत. यावरून देशातील क्रिकेट प्रेमींची निराशा दिसून आली आहे.

Updated : 21 Nov 2023 3:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top