Home > Sports > भारत-श्रीलंका आज तिसरा T20 सामना, प्रथमच होम पिचवर मालिका गमावण्याचा धोका...

भारत-श्रीलंका आज तिसरा T20 सामना, प्रथमच होम पिचवर मालिका गमावण्याचा धोका...

भारत-श्रीलंका आज तिसरा T20 सामना, प्रथमच होम पिचवर मालिका गमावण्याचा धोका...
X

भारत-श्रीलंका (India vs Sri Lanka) टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर (saurashtra cricket stadium) संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. या सामन्याच्या निकालावर मालिकेचा निकाल निश्चित होईल. सध्या तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला प्रथमच श्रीलंकेकडून घरच्या मैदानावर मालिका गमावण्याचा धोका आहे. भारताने 4 वर्षांपूर्वी 2019 मध्ये घरच्या मैदानावर सामना गमावला होता. त्यानंतर त्याचा ऑस्ट्रेलियाकडून (australia) 2-0 असा पराभव झाला. त्यानंतर भारताने घरच्या मैदानावर सलग 11 मालिका जिंकल्या आहेत.

भारतीय संघाने हा सामना जिंकल्यास श्रीलंकेकडून सलग 5 वी टी-20 मालिका जिंकली जाईल. हार्दिकच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील भारतीय श्रीलंकेऑब्त आज सामना खेळणार आहे. दोन्ही संघांनी भारतात आतापर्यंत 5 टी-20 मालिका खेळल्या आहेत. भारताने 4 जिंकले आहेत, एक सामना ड्रॉ झाला आहे. गेल्या 6 वर्षांपासून राजकोटमध्ये भारताचा पराभव झालेला नाही

गेल्या 6 वर्षांपासून भारतीय संघ राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर हरलेला नाही. येथे एकूण 4 सामने खेळले आहेत. यापैकी तीन जिंकले आहेत तर एक पराभव झाला आहे. 2017 मध्ये येथे न्यूझीलंडकडून भारताचा 40 धावांनी पराभव झाला होता.

Updated : 7 Jan 2023 9:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top