Home > Sports > पृथ्वी शॉ कडे मांडवलीसाठी सपना गिलची पैशाची मागणी

पृथ्वी शॉ कडे मांडवलीसाठी सपना गिलची पैशाची मागणी

दोन दिवसांपूर्वी पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याच्या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायल झाला होता. मात्र या आता या प्रकरणामध्ये सपना गिलने मांडवली करण्यासाठी पैशाची मागणी केली असल्याचे न्यायालयात समोर आले आहे.

पृथ्वी शॉ कडे मांडवलीसाठी सपना गिलची पैशाची मागणी
X

भारतीय क्रिकेटपट्टू (Cricket) पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सपना गिल (Sapna Gill) यांच्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या मारहाण प्रकरणी रोज नवनविन खुलासे समोर आले आहेत. सपना गिलने या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी पृथ्वी शॉ आणि त्याच्या मित्राकडे मांडवली करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. ही माहिती कोर्टात समोर आली आहे. पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्यामध्ये सेल्फी घेण्यावरुन मुंबईच्या सहारा स्टार (Sahara Star) हॉटेलमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर सपनासोबत पृथ्वीची हॉटेलबाहेरसुद्धा बाचाबाची झाली होती. आणि याचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सपनाच्या हातामध्ये बेसबॉलची (baseball) स्टीक असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि पृथ्वी तिच्या हातामधून ही स्टीक सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सपना ही स्टीक सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र सपनाने पृथ्वी आणि त्याच्या मित्रांकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल ५० रुपयांची मागणी केली, असे कोर्टात सांगण्यात आले. सपनावर हा आरोप पृथ्वीच्या मित्रांनी कोर्टात केला आहे. पण आरोपाचे खंडन सपनाचे वकील काशिद अली (Kashid Ali) केले आहे. सपनाने हे प्रकरण मिटवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली नसल्याचे तिचे वकील काशिद अली यांनी सांगितले आहे. आणि याचा कोणताही पुरावा नसल्याचे सुद्धा सांगितले आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर दोन्ही पक्षाकडून बोलण्यास नकार देण्यात आला आहे.

Updated : 18 Feb 2023 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top