Home > Sports > क्रिकेटचा देव सचिनला MCA देणार मोठं गिफ्ट

क्रिकेटचा देव सचिनला MCA देणार मोठं गिफ्ट

सचिन तेंडूलकर ( sachin tendulkar ) च्या ५० व्या वाढदिवशी MCA त्याला एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारित आहे. MCA मध्ये सचिन तेंडूलकरचा भव्य पुतळा MCA कडून उभारण्यात येणार आहे. सचिन तेंडूलकर यांना भारतरत्न पुरस्कार देवून यापूर्वी गौरवण्यात आले आहे.

क्रिकेटचा देव सचिनला MCA देणार मोठं गिफ्ट
X

देशात आणि विदेशात आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडूलकर(sachin tendulkar)यांनी MCA मोठं गिफ्ट देण्याच्या तयारित आहे. सचिनने भारतासाठी खेळताना ज्या मैदानात यशाची अनेक शिखरे जिथे पादाक्रांत केली अशा वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेटच्या देवाचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय MCA ने घेतला आहे. क्रिकेटमधून सचिनने जरी निवृत्ती घेतली असली तरी MCA हा निर्णय १० वर्षानंतर घेतला आहे. २४ एप्रिलला तेंडूलकर आपला ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यावेळी किंवा या वर्षाच्या अखेरीस ५० षटकांच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण करण्याचा मानस MCA ने बोलून दाखवला आहे. आज वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडूलकर( sachin tendulkar)आणि MCA चे अध्यक्ष अमोल काळे हे पुतळा नेमका कुठे बसवायचा हे पाहण्यासाठी पोहचले होते.

वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडूलकर ( sachin tendulkar)यांचा हा पहिला पुतळा असणार आहे. तो नेमका कुठे ठेवायचा हे लवकरच ठरवण्यात येणार असल्याचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांनी सांगितले. तेंडूलकर हे भारतरत्न आहेत. त्यांनी क्रिकेटसाठी काय केले आहे हे सर्वांना माहीत आहे. तीन आठवड्यापूर्वी सचिनने यासाठी परवानगी दिली असल्याचे MCA चे अध्यक्ष काळे यांनी सांगितले. वानखेडे स्टेडीयममध्ये ( Wankhede Stadium ) सध्या सचिनचे नाव असलेले स्टॅड आहे. एमसीएने भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी कॉर्पोरेट बॉक्स आणि फलंदाजीतील दिग्गज दिलीप वेंगसरकर ( Dilip Vengsarkar ) यांच्या नावाचा स्टँड उभारुन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता. देशात क्रिकेटपटूंचे पुतळे स्टेडियममध्ये नाहीत. विदर्भ क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, आंध्रमधील व्हीडीसीए स्टेडियम आणि इंदूरमधीर होळकर स्टेडियममध्ये भारताचे माजी महान फलंदाज सी.के. नायडू यांचे असे तीन स्वतंत्र पुतळे आहेत.

मेलबर्न ( Melbourne ) क्रिकेट ग्राउंडवर दिवंगत शेन वॉर्नचा ( Shane Warne ) क्रिकेटपटूंचा सर्वात प्रसिद्ध पुतळा आहे. २०१९ मध्ये वॉर्नने अनावरण करताना हा माझा एक मोठा सन्मान असल्याचे सांगितले होते. स्वत:ला तिथे पाहणे थोडे विचित्र आहे पण मला खूप अभिमान आहे. असल्याचे सांगितले होते. हा पुतळा ३०० किलोचा आहे. भारतातही सचिन तेंडूलकरसाठी असाच भव्य पुतळा उभारण्याचे काम सुरु आहे. सचिनने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि एक टी-२० सामने खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके आणि ३४,३५७ धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे.

Updated : 28 Feb 2023 2:56 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top