Home > Sports > #Tokyo2020 : भारताचं आणखी एक मेडल निश्चित, रवी कुमार दहिया फ्री स्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत

#Tokyo2020 : भारताचं आणखी एक मेडल निश्चित, रवी कुमार दहिया फ्री स्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत

#Tokyo2020 : भारताचं आणखी एक मेडल निश्चित, रवी कुमार दहिया फ्री स्टाईल कुस्तीच्या अंतिम फेरीत
X

Tokyo Olympic 2020 मध्ये भारतासाठी बुधवारचा दिवस आनंदाचा ठरला आहे. भारताने दोन पदक आपल्या नावावर केली आहेत. पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटात रवी कुमार दहिया याने कझाकिस्तानचा सनायेव याला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. रवी कुमारच्या उपांत्य फेरीतील या विजयामुळे भारताचं आणखी एक मेडल निश्चित झालं आहे.

उपांत्य फेरीतील पहिल्या फेरीच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये दोन्ही कुस्तीपटूंनी गुण नोंदवल्याने लढत अगदी चुरशीची झाली होती. परंतू दुसऱ्या फेरीत कझाकिस्तानच्या सनायेवने आक्रमक केळ करत सलग ८ गुण नोंदवले. यामुळे सनायवने सामना जवळजवळ जिंकल्यात जमा होता. परंतू रवी कुमारने पुनरागमन करत कझाकिस्तानच्या कुस्तीपटूला चितपट करत हा सामना जिंकला.

आतापर्यंतचे ऑलिंपिक पदकवीर कुस्तीपटू

खाशाबा जाधव (१९५२ मध्ये कांस्यपदक), सुशील कुमार (२००८ मध्ये कांस्य आणि २०१२ मध्ये रौप्य) आणि योगेश्वर दत्त (२०१२ मध्ये कांस्य) यांनी ळाडूंनी आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. आता रवी कोणतं पदक जिंकणार सुवर्ण कि रौप्य? याकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागल्या आहेत.

Updated : 4 Aug 2021 10:23 AM GMT
Next Story
Share it
Top