Home > Sports > पनवेल च्या बॉक्सर्स ची राष्ट्रीय स्तरावर निवड

पनवेल च्या बॉक्सर्स ची राष्ट्रीय स्तरावर निवड

पाचगणी येथे १६ वी राज्य थाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेतील यशामुळे पनवेलच्या बॉक्सर्स चे राष्ट्रीय स्पर्धेतील स्थान निश्चित झाले आहे.

पनवेल च्या बॉक्सर्स ची राष्ट्रीय स्तरावर निवड
X

पाचगणी महाबळेश्वर येथे १६ वी राज्य थाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील ३५० खेळाडुंनी सहभाग घेतला होता. पनवेल मधील युनायटेड शोतोकान आसोसिएशन इंडिया चे ४ खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी झाले होते.विशेष म्हणजे या सर्वानींच पदकांची लयलूट केली. अथर्व मसुरकर ने ४० किलो वजनी गटात तर स्मित पाटील याने ३६ किलो खालील वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले. याशिवाय पंक्ती पाठक हिने ४० किलो खालील वजनी गटात आणि ७५ किलो वरील वजनी गटात आर्यन बंगेरा याने रौप्य पदकाची कमाई केली.


या स्पर्धेत मिळवलेल्या घवघवीत यशामुळे या चौघांचीही गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत निवड झाली आहे. त्यामुळे या चौघांवरही आता पनवेलकरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडीयाने या चौघांचेही कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated : 31 Aug 2021 9:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top