मुंबई : भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारतीय चाहत्यांची निराशा झाली आहे. भारताच्या पराभवावर पाकिस्तानी वेबसाइटने ट्विटरवर खिल्ली उडवली. ज्याला भारताचा माजी क्रिकेटर वसीम जाफरने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय संघ टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या स्पोर्ट्स वेबसाईट 'पाकिस्तान क्रिकेट'ने ट्विटरवरून खिल्ली उडवली. या वेबसाईटने टीम इंडियाच्या चाहत्यांना विचारले की, 'भारतीय चाहत्यांना कसे वाटते?' या प्रश्नाला चाहत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर दिले असले तरी माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने सडेतोड उत्तर दिले.
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम जाफरने पाकिस्तानी वेबसाईटच्या ट्विटचा हवाला देत लिहिले, '१२-१ च्या दरम्यान खूप जास्त जेवण केले, तरीही पोट भरल्यासारखे वाटत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये 13 सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 12 वेळा तर पाकिस्तानने 1 सामन्यात विजय मिळवला आहे.याचीच आठवण करून देत जाफरने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.